गोपनीयता धोरण
तुमची माहिती आम्ही कशी वापरतो, हे इथे सोप्या शब्दांत दिलं आहे.
आम्ही काय गोळा करतो
- नाव, वय, जन्मतारीख, लिंग व फोटो.
- मोबाईल नंबर व ईमेल.
- शिक्षण, नोकरी, उत्पन्न व शहर.
- जात व पोटजात.
- वैवाहिक स्थिती व कुटुंबाची माहिती.
- रक्तगट, आणि आरोग्याबद्दल तुम्ही स्वतः लिहिलेली माहिती.
- जन्मवेळ, जन्मस्थळ, रास व नक्षत्र — कुंडली जुळणीसाठी.
- स्वतःबद्दल व जोडीदाराकडून अपेक्षांबद्दल तुम्ही लिहिलेला मजकूर.
ही माहिती कशासाठी वापरली जाते
- फक्त एकाच कामासाठी — तुम्हाला जोडीदार सुचवण्यासाठी, आणि तुमचं प्रोफाईल विरुद्ध लिंगाच्या सदस्यांना दाखवण्यासाठी.
- तुमचा मोबाईल नंबर सुरुवातीला कुणालाही दिसत नाही. दोघांनी एकमेकांना होकार दिल्यावर, किंवा समोरच्या सदस्याने सदस्यत्व फी भरल्यावरच तो दिसतो.
- तुमची माहिती कुणालाही विकली जात नाही व जाहिरातीसाठी दिली जात नाही.
- प्रोफाईलमधला मजकूर वाचकाच्या भाषेत दाखवण्यासाठी तो आपोआप (AI) भाषांतरित केला जातो. फोटो व मजकुरावर आपोआप प्राथमिक चाळणीही लावली जाते.
प्रोफाईल कधी दिसू लागतं
- नोंदणी पूर्ण होताच प्रोफाईल इतर सदस्यांना दिसू लागतं. ॲडमिन ते नंतर बघतो व चुकीचं आढळल्यास काढून टाकतो — म्हणजे आधी तपासणी होत नाही.
- संस्था कागदपत्रं, उत्पन्न, नोकरी, जात किंवा वैवाहिक स्थिती कधीही तपासत नाही.
तुमचे हक्क
- तुमची माहिती कधीही बदलता येते — "प्रोफाईल बदला" वापरा.
- माहिती साठवण्याची संमती कधीही मागे घेता येते — "खातं कायमचं काढा" वापरा. खातं काढताच प्रोफाईल, फोटो व सर्व माहिती लगेच कायमची नष्ट होते; ती परत मिळत नाही.
- तक्रार असल्यास तक्रार निवारण अधिकाऱ्यांना कळवा (info@vadarvivah.com) — त्यांचा तपशील या पानाच्या शेवटी आहे. त्यांच्या उत्तराने समाधान झालं नाही तर डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा, २०२३ नुसार Data Protection Board of India कडे तक्रार करता येते.
सुरक्षितता
- पासवर्ड कूटबद्ध स्वरूपात ठेवला जातो — तो ॲडमिनलाही दिसत नाही.
- OTP, पासवर्ड किंवा बँक तपशील संस्था कधीच फोनवर किंवा मेसेजवर विचारत नाही. कुणी विचारलं तर ती फसवणूक आहे.